
सामना ऑनलाईन । मुंबई
दादरच्या जुन्या फुलबाजाराजवळ उपेंद्रनगरमधील रहिवासी गजानन चोपडे यांच्या घरात रविवारी दुपारी अचानक साप घुसल्याने एकच धावपळ उडाली. यावेळी स्थानिक गटप्रमुख जावेद शेख, शाखाप्रमुख यशवंत विचले यांनी सर्पमित्र अनुज खानविलकर यांच्याशी तातडीने संपर्क करून साप ताब्यात घेण्यात यश मिळवले. यावेळी विशाल तळावडेकर, अमित लवेकर, विशाल चव्हाण, कृष्णा भागडे, रमेश सोडये आदी उपस्थित होते.

































































