’सोलरयान 2.0’चे अनावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ’सोलरयान’ने आपल्या विकासाचा नवा टप्पा गाठत ’सोलरयान 2.0’चे अनावरण केले आहे. केवळ सोलर इन्व्हर्टर बनवण्यापुरते मर्यादित न राहता, आता कंपनी हायब्रिड ऊर्जा उपाययोजना, बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली आणि एकात्मिक ऊर्जा तंत्रज्ञानावर अधिक भर दिला जाणार असल्याचे सोलरयानकडून सांगण्यात आले. सोलरयान कंपनीने गेल्या वर्षात देशभरात 5 लाखांहून अधिक सौर प्रकल्पांना ऊर्जा पुरवण्याचा टप्पा यशस्वीरीत्या पार केला आहे. सध्या गुजरातसह महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक आणि तामिळनाडू यांसारख्या 12 हून अधिक राज्यांमध्ये कंपनीचे जाळे पसरले आहे. आता पुढील टप्प्यात 15 हून अधिक राज्यांमध्ये विस्तार करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असल्याचे सोलरयानचे संस्थापक आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक मनोज पटेल यांनी सांगितले. यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग पटेल व सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय सहसंचालक शालिन बोटाड्रा उपस्थित होते.