त्र्यंबकेश्वर धार्मिक तेढ; महिन्याभरात अहवाल

नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील शिवमंदिरात प्रवेश करण्यावरून निर्माण झालेल्या धार्मिक तणावाबाबत राज्य सरकारने स्थापन केलेली एसआयटी महिन्याभरात आपला अहवाल सादर करणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली. राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला मुस्लिमांची मंदिरात प्रवेशाची परंपरा होती का, त्याला कोणी छेद देण्याचा प्रयत्न केला आहे का, जाणीवपूर्वक त्यातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला का, एसआयटीचा काय अहवाल आहे, असे प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला माहिती दिली. दरम्यान, यावर कपिल पाटील, दुरार्णी यांनी सहभाग घेतला.