तक्रार अर्जात सहकार्यासाठी लाच मागणारे दोघे ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर शहरातील किजापूर नाका पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक आमच्या ओळखीचे आहेत. तुमच्या तक्रार अर्जात सहकार्य करू, असे म्हणून तक्रारदाराकडून दीड लाख रुपये लाचेची मागणी केलेल्या दोन खासगी इसमांना लाचलुचपत प्रतिबंधक किभागाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकर गुन्हा दाखल करण्याची कार्यकाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

युकराज भीमराक राठोड (रा. समर्थनगर, जुळे सोलापूर) क साजन रमेश हाकळे (रा. ए किंग 705, मंगल रेसिडेन्सी, जुळे सोलापूर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नाके आहेत.

तक्रारदाराकिरुद्ध सोलापूर शहर येथील पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या अर्जामध्ये सहकार्य करून त्यांच्या किरुद्ध दाखल अर्जाकरून गुन्हा दाखल न करण्याकरिता विजापूर नाका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आमच्या चांगल्या परिचयाचे आहेत, असे सांगून तक्रारदाराकडून 1 लाख 50 हजार लाचेची मागणी आरोपींनी केली होती. पंचांसमक्ष केलेल्या पडताळणी पंचनाम्यामध्ये ही गोष्ट सिद्ध झाल्याने दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार शिरीषकुमार सोनकणे, अर्चना स्कामी, पोलीस नाईक अतुल घाडगे, श्रीराम घुगे, कॉन्स्टेबल स्कप्नील सन्नके यांनी ही कारवाई केली.