
दिवा, कळवा व मुंब्य्रातील नवनियुक्त पदधिकाऱयांची बैठक आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ निवासस्थानी घेण्यात आली. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सर्वसामान्य जनतेशी संपर्क ठेवून त्यांच्या अडीअडचणी सोडवा, असे आवाहन केले. तसेच दिवा, कळवा, मुंब्य्रात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा, असेही आवर्जून सांगितले.
दिवा, कळवा व मुंब्रा भागात नवनियुक्त पदाधिकाऱयांची नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पक्षनिष्ठा, संघटनात्मक बांधणी आणि जनतेसाठी कोणती व कशा प्रकारे कामे करायची याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. शिवसेना पक्षप्रमुखांच्या या मार्गदर्शनामुळे पदाधिकाऱयांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे.
कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, कल्याण जिल्हाप्रमुख अभिजित सावंत यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस कल्याण लोकसभा जिल्हा संघटक रवींद्र सुर्वे, कल्याण लोकसभा जिल्हा संघटक कल्पना कवळे, कल्याण लोकसभा उपजिल्हाप्रमुख अॅड. रोहिदास मुंडे, उपजिल्हाप्रमुख विजय देसाई, ज्येष्ठ शिवसैनिक राम पाटील, दिवा शहरप्रमुख सचिन पाटील, कळवा शहरप्रमुख लहू चाळके, कळवा उपशहरप्रमुख गुरुदत्त देसाई व नंदू पाटील, विभागप्रमुख सतीश मांडरेकर, सचिन पारकर, गोपीनाथ पाटील, संतोष कवळे, नंदकुमार दुराफे, दुर्योधन फडतरे, लवेश जाधव, संतोष सुर्वे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
































































