Video : प्रसिद्ध अभिनेत्यावर आली छत्री-कणीस विकण्याची वेळ? वाचा सविस्तर

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये गुत्थी, डॉ. गुलाटी, रिंकु देवी अशा अनेक भूमिकांमुळे प्रसिद्धीस आलेला कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हर सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. कपिल शर्मा याच्यासोबत झालेल्या वादानंतर सुनील ग्रोवर याने द कपिल शर्मा या शोला कायमचा रामराम केला. असे असले तरी तो सोशल मिडियावर खूप सक्रिय असतो. कधी व्हिडिओ तर कधी फोटो पोस्ट करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतो.

पोस्टमध्ये तो कधी शेंगदाणे विकताना दिसतो. तर कधी दूध विकताना दिसतो. तसेच एका फोटोमध्ये तर तो कांदे-बटाटे विकताना देखील दिसला होता. दरम्यान त्याने पुन्हा एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो मक्याची कणिसं विकताना दिसत आहे एवढेच नाही तर भर पावसात रस्त्याच्या कडेला बसून छत्रीदेखील विकतानाचे फोटो त्याने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. त्याचे हे फोटो आणि व्हिडिओ पाहून चाहते थक्क झाले आहेत. त्याची ही पोस्ट खूप व्हायरल झाली असून  या पोस्टवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover)

पोस्टवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

काही चाहत्यांनी सुनील ग्रोव्हरला कपिल शर्मा शोमध्ये तू कधी परत येशील, असे प्रश्न विचारले आहेत. तर कॉमेडियन श्याम रंगीलाने ‘एखाद्या व्यवसायात काही दिवस टिक भावा, रोज व्यवसाय बदलशील तर कसं होईल,’ असं म्हटलं आहे. तर अनेकांनी त्याच्या साधेपणाचंही कौतुक केलं आहे.