
प्रेम आणि विश्वासावर आधारलेले पती-पत्नीचे नाते आजच्या युगात मरत चालले आहे की काय, अशी काळीज पिळवटून टाकणारी घटना ओडिसा येथे घडली आहे. पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा चिरला. एवढेच नाही तर पत्नीचे कापलेले डोके घेऊन 12 किलोमीटर चालत पोलीस ठाणे गाठले. या भयावह घटनेमुळे एकाच खळबळ उडाली आहे.
ही घटना ओडिशाच्या ढेंकनाल येथे घडली आहे. नाकाफोडी माझी हे पत्नी चंचला आणि दोन मुलांसह राहत होते. त्यांच्या एका मुलाचे लग्न झाले आहे. ज्या वयात नाकाफोडी आणि त्यांची पत्नी चंचला यांचे नाते अधिक घट्ट व्हायला हवे. त्या वयात दोघांमध्ये दिवसेंदिवस अंतर वाढतच होते. नाकाफोडी यांना आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यांना वाटायचे की आपल्या बायकोचे अफेअर आहे.
चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये एकेदिवशी जोरात भांडण झाले, यावेळी माझीने धारदार शस्त्राने पत्नीची हत्या केली. दुसऱ्या दिवशी तो पत्नीचे शीर धडावेगळे करून ते शीर पोलिस ठाण्यात घेऊन गेला. माझीने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. यानंतर पोलिसांनी महिलेची हत्या करण्यात आलेले शस्त्रही जप्त केले आहे. याप्रकरणी आता पोलीस ठाण्यात माझी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





























































