
सामना ऑनलाईन । केंनझार
एका विवाहीत महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवणे एका पुरुषाला भलतेच महागात पडले आहे. ओडिशातील केंनझार जिल्ह्यातील एका विवाहीत महिलेने रागाच्या भरात तिच्या प्रियकराचे लिंग छाटले. याप्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.
राजेंद्र नायक असे त्या प्रियकराचे नाव असून तो कामानिमित्त चेन्नई येथे राहतो. राजेंद्रचे त्याच्या बादाऊगान गावातील एका २४ वर्षीय विवाहीत महिलेसोबत अनैतिक संबंध होते. कमला पात्रा असे त्या महिलेचे नाव आहे. शुक्रवारी राजेंद्र त्याच्या गावी परतला व शनिवारी तो कमलाला भेटायला तिच्या घरी गेला. त्यावेळी त्यांचे शारीरिक संबंध ठेवत असताना त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात कमलाने स्वयंपाक घरातील चाकून राजेंद्रचे गुप्तांग कापले. गंभीर जखमी झालेल्या राजेंद्रने फोन करून त्याच्या भावांना याविषयी सांगितले. त्यानंतर ते तत्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांनी राजेंद्रला रुग्णालयात दाखल केले. तसेच त्यांनी पोलिसांत तक्रार देखील दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी कमलाला अटक केली आहे.





























































