
निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेला (एसआयआर) गैरहजर राहणाऱया 49 कर्मचाऱ्यांविरुद्ध आयोगाने धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 178 – धारावी विधानसभा मतदारसंघ येथे एसआयआर मोहीम सुरू आहे. त्यात नियुक्ती आदेश मिळूनही अद्याप मोठय़ा संख्येने कर्मचारी कर्तव्यावर हजर झालेले नाहीत. यामुळे निवडणुकीच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. या हलगर्जीपणाची गंभीर दखल घेत अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मतदार नोंदणी अधिकारी अजित नैराळे यांनी गैरहजर 49 कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली.

























































