
तुम्हाला 25 लाखांची लॉटरी लागली आहे, अशी बतावणी करत सायबर गुन्हेगारांनी क्रॉफर्ड मार्केट परिसरात राहणाऱया एका 74 वर्षीय वृद्धाला तीन लाख 54 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रफी अहमद मर्चंड यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला आणि समोरच्याने तुम्हाला 25 लाखांची लॉटरी लागली आहे असे सांगत ही रक्कम स्वीकारण्यासाठी जीएसटी, प्रोसेसिंग फी, टॅक्स व कायदेशीर परवानगी शुल्कापोटी काही रक्कम भरावी लागेल असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवत मर्चंड यांनी रक्कम ऑनलाईन पाठवली.






























































