गोविंदा आला रे… आयडियलची पर्यावरणपूरक दहीहंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि दादर येथील आयडियल बुक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच श्री साई दत्त मित्र मंडळ आणि बाबू शेठ पवार व मित्र मंडळ यांच्या सहकार्याने पर्यावरणपूरक दहीहंडी उत्सव यंदाही आयडियल गल्ली, दादर येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. महिला आणि पुरुष गोविंदा पथकांच्या विशेष सलामीने दहीहंडी उत्सवाची सुरुवात होईल. शिवसागर गोविंदा पथकाकडून तीन थर रचून चौथ्या थरावर बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचा इतिहास मांडला जाणार आहे. या देखाव्याचे सादरीकरण सकाळी 10 वाजता सुरू होईल. यावेळी मिस्टर एशिया रोहन कदम, मिस्टर इंडिया सुहास खामकर यांच्यासह भूषण घाडी, ओंकार राऊत, सुनील गोडबोले, शिवानी बाणे, सायली पाचपुते आणि जीवन चौहान हे सेलिब्रेटी उपस्थित राहणार आहेत. दिव्यांग व अंध गोविंदा पथकाची सलामी उत्सवाचे आकर्षण असणार आहे.