प्रभादेवीत 10 लाखांची दहीहंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सह्याद्री प्रतिष्ठान आणि शिवसेना माहीम विधानसभेच्या वतीने आमदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभादेवी येथे तब्बल 10 लाख रुपयांची दहीहंडी आयोजित करण्यात आली असून या दहीहंडीची गोविंदा पथकांमध्ये जोरदार चर्चा आहे. मुंबईतील नामांकित गोविंदा पथके या दहीहंडीत सहभागी होणार आहेत. दहीहंडी हा केवळ मनोरंजनाचा उत्सव नसून एकजूट, धाडस, शिस्त आणि सांघिक भावना यांचे प्रतीक आहे. याच भावनेतून सह्याद्री प्रतिष्ठानने भव्य दहीहंडीचे आयोजन करून गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे महेश सावंत यांनी सांगितले. दहा लाखांच्या या दहीहंडीमुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवातील चुरस वाढणार असून, कोणते गोविंदा पथक सर्वाधिक उंच थर रचून हंडी फोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.