जोगेश्वरीतील पाणीपुरवठा आठवडाभरात सुरळीत होणार, शिवसेनेचे पालिका प्रशासनाला पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील विविध भागांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने स्थानिक नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येची दखल घेत शिवसेना आमदार अनंत (बाळा) नर यांनी पालिका प्रशासनाला पत्र लिहून तातडीने समस्या सोडवण्याच्या सूचना केल्या. त्यावर आठवडाभरात पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन पालिकेकडून देण्यात आले.

जोगेश्वरीत पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलाशयालाच आवश्यक पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे हा तुटवडा जाणवत आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर आमदार बाळा नर यांनी अतिरिक्त पालिका आयुक्त अभिजित बांगर यांना पत्र लिहिण्याबरोबर बैठकदेखील घेतली. बैठकीत शिवसेनेचे स्थानिक सर्व नगरसेवक उपस्थित होते.