
इराण इस्रायल युद्धामुळे देशभरात सिलेंडरचा मोठा तुटवडा झाला आहे. एकीकडे लोकं सिलेंडरसाठी मोठ मोठ्या रांगा लावत असताना दुसरीकडे केंद्र सरकारकडून मात्र सिलेंडरचा मुबलक पुरवठा असल्याचा दावा केला जात आहे. या सर्वादरम्यान केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 13, 2026
तो फोटो शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते, खासदार संजय राऊत यांनी शेअर केला असून त्यातून भाजपवर निशाणा साधला आहे. या फोटोत स्मृती इराणी सिलेंडरसोबत रस्त्यावर बसल्या असून त्यावर लापता लेडिज असे लिहण्यात आले आहे. या फोटोचा संबंध स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे सरकार असताना सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानंतर केलेल्या आंदोलनाशी आहे.
2011 मध्ये केंद्रात जेव्हा काँग्रेसचे मनमोहन सिंग यांचे सरकार होते तेव्हा भाजपने सिलेंडरच्या वाढत्या दराविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनात भाजप नेत्या स्मृती इराणी आघाडीवर होत्या. त्यावेळी स्मृती इराणी सिलेंडर घेऊन रस्त्यावर बसल्या होत्या.
स्मृती इराणींचे ट्विटही होतेय व्हायरल
2011 मध्ये केंद्र सरकारने घरगुती सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ केली होती. त्याबाबत इराणी यांनी ट्विट करत तत्कालिन सरकारवर टीका केली होती. ”LPG च्या दरात 50 रुपये वाढवले आणि हे स्वत:ला आम आदमी सरकार म्हणतात. अत्यंत लज्जास्पद आहे”, असे त्यांनी ट्विट केले होते.


























































