
भोंदू वासनांध अशोक खरात याला मंगळवारी न्यायालयाने चौथ्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. एसआयटीच्या ताब्यातील त्याचा मुक्काम वाढला आहे.
विशेष तपास पथकाने सोमवारी खरातला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. मंगळवारी पुन्हा चौथ्या गुह्यात त्याला हजर करण्यात आले. आपण दैवी अवतार असल्याचे सांगून त्याने जाळ्यात ओढून महिलेवर अत्याचार केला. तांब्याच्या भांडय़ातील पाणी पिण्यासाठी दिले. हा गुन्हा वेगळा असल्याने पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. न्यायालयाने 18 एप्रिलपर्यंत कोठडी दिली.
मर्सिडीज कार जप्त
लॉजिस्टिक व्यवसायातील यशासाठी पुण्यातील उद्योजकाला खरातने कोटय़वधींचा गंडा घातला. पूजाविधीच्या नावाखाली विदेशवाऱया केल्या. ‘‘अवतार पूजेसाठी मर्सिडीज कार घेऊन दे, अन्यथा तुझा मृत्यू होईल’’, अशी भीती घालून खरातने नव्वद लाखांची मर्सिडीज घेतली होती. ईडीने ही कार जप्त केली आहे.




























































