मोदींनी आचारसंहितेचा भंग केला! डाव्या पक्षांची तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘विधानसभा निवडणुकीच्या काळात देशाला संबोधित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे,’ अशी तक्रार डाव्या पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार पी. संदोश कुमार आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस एमए बेबी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पत्र लिहिले असून, मोदींवर कारवाईची मागणी केली आहे.

मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यामुळे मोदींनी देशाला संबोधित करताना विरोधकांवर आगपाखड केली. त्या भाषणाचा संदर्भ देत मतदारांवर प्रभाव टाकण्याचा हा प्रयत्न होता. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीच्या तत्त्वाचे हे उल्लंघन आहे,’ असे पत्रात नमूद केले आहे.