‘डिजिटल इंडिया’वाल्या मोदींनी केले कॅश पेमेंट, सोशल मीडियात चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘डिजिटल इंडिया’चा पुरस्कार करणाऱ्या आणि लोकांना डिजिटल होण्याचे आवाहन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या मोदींनी तेथील एका दुकानदाराला चक्क रोख पैसे दिले. सोशल मीडियात याची जोरदार चर्चा रंगली आहे.

नरेंद्र मोदी हे रविवारी बंगालच्या झारग्राम जिह्यात निवडणूक प्रचारासाठी गेले होते. प्रचारातून वेळ काढून त्यांनी तेथे एका दुकानात बंगालच्या प्रसिद्ध ‘झालमुरी’ या पदार्थाचा आस्वाद घेतला. हा पदार्थ खाऊन झाल्यावर मोदींनी दुकानदाराला पैशाबाबत विचारणा केली. दुकानदाराने सुरुवातीला पैसे घेण्यास नकार दिला, मात्र पंतप्रधानांनी आग्रह केल्यावर त्याने दहा रुपये झाल्याचे सांगितले. त्यानंतर मोदी त्याला ऑनलाईन पेमेंट करतील, अशी अपेक्षा होती, मात्र त्यांनी चक्क खिशात हात घातला आणि दहा रुपयांची नोट काढून दिली. त्यावेळी त्यांच्या खिशात इतरही काही नोटा होत्या. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यावर वेगवेगळ्य़ा प्रतिक्रिया उमटत आहेत.