पंतप्रधान मोदींनी कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रमुखांना सुद्धा मेलोडी चॉकलेट दिले पाहिजे, संजय राऊत यांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधत कॉक्रोच जनता पार्टीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह न्यायव्यवस्थेला परखड सवाल केले आहेत. सरन्यायाधीश कॉक्रोच जनता पार्टीचे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर असायला पाहिजेत. तसेच पंतप्रधान मोदींनी कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रमुखांना सुद्धा मेलोडी चॉकलेट दिले पाहिजे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचे फॉलोअर्स मिलियन्समध्ये वाढले आहेत. याला कारणीभूत देशाचे सरन्यायाधीश आहेत. सरन्यायाधीश कॉक्रोच जनता पार्टीचे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर असायला पाहिजेत. कारण तरुणांना कॉक्रोच हे नाव देशाच्या न्यायव्यवस्थेने दिले आहे. आता सोशल मीडियातील इन्स्टाग्राम, ट्विटर किंवा फेसबुक असू दे येथील कॉक्रोच जनता पार्टीचे अकाउंट बंद केले आहे. यासाठी देशाच्या सरन्यायाधीशांना आवाहन आहे की, तुम्ही न्याय करा. ही तुमचीच पार्टी आहे. तुमच्या प्रेरणेतूनच बनवलेली आहे. पण इतक्या लाखोंच्या संख्येने कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन मिळतंय याचा अर्थ या देशात मोठ्या प्रमाणत तरुण बेरोजगार आहेत, अस्वस्थ आहेत, चिंतेत आहेत. त्यांना भारतीय जनता पक्षापासून अपेक्षा भंग झालेला आहे. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीला एवढं समर्थन मिळतंय. हे या देशाचं दुर्दैवं आहे. कॉक्रोच जनता पार्टीवर पंतप्रधान मोदी इटलीत असतील तर त्यांनी तिथून भाष्य केले पाहिजे. आणि इथे आल्यावर कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रमुखांना सुद्धा मेलोडी चॉकलेट त्यांनी दिले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विद्यापीठ व गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याचा भाजप कार्यकर्त्याचा प्रस्ताव, आदित्य ठाकरे यांनी फटकारले

“आमचा वाघांचा पक्ष, आम्ही डरकाळ्या फोडणारच”

नाराजी व्यक्त करण्याचा आम्हालाही अधिकार आहे. हिंदुस्थानच्या संविधानातील अनुच्छेद १० संदर्भात जो निकाल द्यायचा आहे तुम्ही तीन साडेतीन वर्षे चार सरन्यायाधीश बदलले तरी तुम्ही आम्हाला न्याय देत नसाल तर महाराष्ट्राची जनता, संविधानावर प्रेम करणारी देशाची जनता नाराज होणार आणि आपलं मत व्यक्त करणार. आम्ही कॉक्रोच नाही आहोत. आम्ही वाघाचे बच्चे आहोत. कॉक्रोच पक्ष नवीन निर्माण झाला आहे. आमचा वाघांचा पक्ष आहे. आम्ही डरकाळ्या फोडणारच, असे संजय राऊत यांनी सुनावले.

पत्रकाराच्या प्रश्नानंतर मोदी पळताना दिसले हे चित्र देशाच्या लोकशाही व प्रतिष्ठेसाठी अत्यंत गंभीर, संजय राऊत यांची टीका

“अजित पवार गट हा आता हळूहळू नगण्य ठरतोय”

महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत. त्यात एक अजित पवार गट हा आता हळूहळू नगण्य ठरतोय. शिंदे दिल्लीला आले होते असं कळलंय. ते यासाठी आले होते की, देवेंद्र फडणवीस आम्हाला विधान परिषेदत जागा द्यायला तयारी नाहीत. आमच्या तोंडावरती काहीतरी फेकतायत आणि आम्हाला गप्प करतायत. त्यांचा बॉस इथे आहे, अमित शहा हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आमची ताकद कमी आहे विधान परिषदेच्या जागा लढण्यासाठी, पण जिथे ताकद आहे तिथे आम्ही लढू, असे संजय राऊत म्हणाले.