
बाळ माने यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे, अशी माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली.
बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे,
पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्या बद्दल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे!— Sanjay Raut (@rautsanjay61) June 4, 2026
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने बाळ माने यांना उमेदवारी दिली होती. मात्र गुरूवारी त्यांनी अर्ज मागे घेतला. यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.



























































