Konkan News- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, युवासेनेच्या वतीने 7 जून रोजी सडेतोड वक्तृत्व स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय “सडेतोड वक्तृत्व” स्पर्धेचे दि.7 जून रोजी सकाळी 11 वाजता रत्नागिरीतील नाचणे रोड येथील शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
असून “युवकांचे विचार… महाराष्ट्र घडवणार!” हा या स्पर्धेचा मुख्य गाभा आहे.शिवसेना सचिव आणि आमदार वरूण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत आणि अजिंक्य मोरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेना रत्नागिरी जिल्ह्यात हि स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.या स्पर्धेत ‘व्हिजन महाराष्ट्र 2050 आणि ‘राजकारण आणि समाजकारण युवकांची भूमिका’ हे दोन अत्यंत महत्त्वाचे विषय ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 18 ते 35 वर्षे वयोगटाची मर्यादा निश्चित करण्यात आली असून, प्रत्येक स्पर्धकाला आपले सडेतोड विचार मांडण्यासाठी एकूण 4 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. विशेष म्हणजे वक्तृत्व क्षेत्रातील नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे प्रवेश शुल्क पूर्णपणे निशुल्क म्हणजेच विनामूल्य ठेवण्यात आले आहे.

या भव्य जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्याला 10,000 रुपये रोख, द्वितीय क्रमांकाला 7,000 रुपये रोख आणि तृतीय क्रमांकाला 5,000 रुपये रोख अशा आकर्षक बक्षिसांसह चषक देऊन गौरविण्यात येणार आहे, सोबतच स्पर्धेत सहभाग नोंदवणाऱ्या प्रत्येक वक्त्याला प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मानित केले जाईल. रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक आणि वक्तृत्व क्षेत्रात आवड असणाऱ्या सर्व इच्छुकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे.
होऊन आपल्या वाणीची आणि विचारांची ताकद सिद्ध स्पर्धेतील नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 7378707909 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा