
एका हिंदुस्थानी तरुणाने लंडनमध्ये तीन वर्षीय मुलीचे प्राण वाचवले. ही मुलगी एका उंच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीला लटकली होती. मात्र, हा तरुण वेळीच तिथे पोहोचला आणि त्यानं क्रिकेटपटूसारखा अप्रतिम झेल घेतला. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून जगभरातील नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.


























































