
खर्चासाठी पैसे दिले नाही याचा राग धरून एका तरुणाने आपल्या चुलत भावावर धारदार शस्त्राने शरीरावर वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना क्रॉफर्ड मार्केट येथे घडली. याप्रकरणी आरोपी विरोधात एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उबेद दोराजीवाला याच्यावर प्राणघातक हल्ला झाला. क्रॉफर्ड मार्केट येथील जॅक्स कलेक्शन गल्ली नंबर 4 येथील दुकानात ही घटना घडली. उबेद याने खर्चासाठी पैसे दिले नाही म्हणून त्याचा चुलत भाऊ मोईन युसुफ शिवानी (40) याने त्याच्याकडील धारदार शस्त्राने उबेदच्या डोकं, मान, खांदा, पोट, कान, हात तसेच अन्य ठिकाणी वार केले. यात उबेद गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


























































