
चेकवर खाडाखोड किंवा ओव्हररायटिंग झाल्यास चेकद्वारे फसवणूक झाल्याची शक्यता असते. त्यामुळे बँक सामान्यतः असा चेक नाकारते.
चेकचा सुरळीत व्यवहार करण्यासाठी ज्या व्यक्तीने किंवा संस्थेने तुम्हाला चेक दिला आहे त्यांना खाडाखोड न केलेला नवीन चेक देण्याची विनंती करणे.
जर चेकवर छोटी-मोठी चूक सुधारली असेल तर चेक देणाऱया व्यक्तीला दुरुस्तीच्या बाजूला आपली पूर्ण स्वाक्षरी करावी लागते. मात्र यासाठी प्रत्येक बँकेचे वेगळे नियम असतात.
चेक बाऊन्स होणे किंवा नाकारले जाणे यामागे खाडाखोड असण्यासोबतच अपुरे पैसे, चुकीची सही किंवा तारखेतील चूक अशी अनेक कारणे असू शकतात.
चेक बाऊन्स झाला किंवा नाकारला गेला तर दंड भरावा लागतो तसेच CIBIL स्कोरवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. अधिक गंभीर प्रकरणांमध्ये शिक्षाही होऊ शकते.




























































