४८ तासात एकतरी स्मार्ट मीटर बसवून दाखवाच, महावितरणला शिवसेनेचा सज्जड दम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महावितरणच्या ठाणे शाखेकडून कोकणातील लाखो वीज ग्राहकांना 48 तासात स्मार्ट मीटर बसवू असा धमकीवजा संदेश पाठवण्यात आला होता. या संदेशामुळे वीजग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.आज (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने महावितरणच्या रत्नागिरीतील कार्यालयावर धडक दिली. ४८ तासात स्मार्ट मीटर बसवू असे धमकीवजा मेसेज पाठवताय तुम्ही ४८ तासात एक तरी स्मार्ट मीटर बसवून दाखवा मग शिवसैनिक पहा काय करतात ते असा सज्जड दम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी दिला आहे.

महावितरणच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना शिवसेनेने निवेदन दिले. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता कदम, तालुकाप्रमुख मयुरेश पाटील, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवासेना जिल्हाधिकारी प्रसाद सावंत, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, विभागप्रमुख किरण तोडणकर, शशी बारगोडे, महिला उपजिल्हा संघटक रशिदा गोदड, महिला शहर संघटक सेजल बोराटे, नगरसेविका फौजिया मुजावर यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.