
हिंदुस्थान-A, श्रीलंका-A आणि अफगाणिस्तान-A या संघांमध्ये सध्या तिरंगी मालिका सुरू आहे. या मालिकेतील 15 जून रोजी हिंदुस्थानविरुद्ध श्रीलंका सामना सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सामन्यात दोन्ही संघांची तुंबळ लढाई पाहायला मिळाली. दोन्ही संघांनी सामना खेचून आणण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने बाजी मारत टीम इंडियाचा पराभव केला. मात्र, सामना संपल्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये मैदानातच राडा झालेला पाहायला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. आता या धक्का-बुक्कीच कारण समोर आलं आहे.
क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार, वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या हलमबागे यांच्यामध्ये बाचाबाची झाली. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 17 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात फलंदाजी साठी आलेल्या वैभव सूर्यवंशी आणि सूर्यांश शेडगे यांना फक्त 9 धावा करता आल्या आणि टीम इंडियाचा पराभव झाला. मात्र, सामना संपल्यानंतर तंबुत परतत असताना हलमबागे वैभवला म्हणाला की, ‘सामना संपला आहे… आता तू घरी जा’ असं म्हणताच वैभवचा पारा चढला आणि वैभव थेट श्रीलंकेला भिडला. मात्र, इतर खेळाडूंनी मध्यस्थी केल्यामुळे वातावरण शांत झाल. मात्र, आता या सर्व प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
मेस्सीच्या अखेरच्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात, गतविजेत्या अर्जेंटिनासमोर अल्जेरियाचे आव्हान





























































