
काही वेळेला पाणी कमी झाल्याने पदार्थ करपतो आणि कुकर आतून काळाकुट्ट होतो. अशा वेळी काही ट्रिक्स वापरून प्रेशर कुकर अगदी नव्यासारखा चमकू शकतो. कुकरमध्ये पाणी टाकून त्याला उकळी काढा. आतील अन्नाचे कण सुटतील.
कुकरच्या करपलेल्या भागावर एक ते दोन चमचे बेकिंग सोडा टाका. आता यामध्ये थोडं गरम पाणी घालून 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या. नंतर स्वच्छ करा. अन्य उपाय म्हणजे पाण्यात लिंबाचा रस मिसळून ते पाणी काही मिनिटं उकळवून घ्या.






























































