इंडोनेशियाला 6.7 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडोनेशियाच्या काही भागांना मंगळवारी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 6.7 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. या भूकंपामुळे मालमत्तेच्या नुकसान किंवा जीवितहानीबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, इंडोनेशियाच्या काही भागांत भूकंपाचे अनेक धक्के बसले. पहिल्या धक्क्यामुळे एका मिनिटापेक्षा जास्त काळ तीव्र हादरे बसले. भूकंप होताच लोक आपापल्या घरातून बाहेर धावले. भूकंपाचा केंद्रबिंदू मध्य सुलावेसी प्रांताची राजधानी असलेल्या पालुच्या पूर्व-आग्नेय दिशेला 46 किलोमीटर (29 मैल) अंतरावर होता. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने भूकंपाची खोली सुमारे 10 किलोमीटर (6 मैल) असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.