शेतकर्‍यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शिवसेनेची ‘बळीराजा गर्जना,ट्रॅक्टर रॅली’; विभागीय आयुक्तालयावर धडकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shiv-sena-ubt-launches-baliraja-garjana-tractor-rally-in-chhatrapati-sambhajinagar-for-farmer-loan-waiver (4)

शेतकर्‍यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मराठवाडाव्यापी ‘बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली’ आयोजित करण्यात आली आहे. ‘नको अटी – नको शर्ती, आम्हाला पाहिजे-कर्जमुक्ती’ या घोषवाक्याखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये ही रॅली क्रांतीचौक येथून काढण्यात आली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना उपनेते सुभाष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे यांच्या संयोजनाखाली निघालेली ही बळीराजा गर्जना ट्रॅ्क्टर रॅली विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकली.

क्रांती चौक येथून बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅलीला सुरूवात झाली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे, शिवसेना उपनेते सुभाष पाटील हे ट्रॅक्टरवर अग्रभागी बसलेले होते. हातात बॅनर, पोस्टर घेऊन शेतकरी शिवसैनिक सहभागी झाले होते. कर्जमाफी नको संपूर्ण कर्जमुक्ती द्या, नको अटी, नको शर्ती आम्हाला पाहिजे कर्जमुक्ती, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तुम आगो बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला, एका रांगेत ट्रॅक्टर घेऊन शेतकरी निघाले होते. ही रॅली सिल्लेखाना मार्ग, पैठणगेट, गुलमंडी, नारळीबाग, पोलीस आयुक्त कार्यालय, ज्युबली पार्क, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकली.

विभागीय आयुक्त कार्यालयावर रॅली पोहचल्यानंतर प्रभारी विभागीय आयुक्त विनय गौडा यांना शेतकर्‍यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसह शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांबाबत विभागीय आयुक्तांमार्फत राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात आले. या ट्रॅक्टर रॅलीमध्ये शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे, शिवसेना उपनेते सुभाष पाटील, माजी आमदार उदयसिंग राजपूत, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र काळे, जिल्हा संघटक डॉ. सुनील शिंदे, डॉ. शोएब हाश्मी, किसान सेना जिल्हाप्रमुख नानासाहेब पळसकर, बाबासाहेब मोहिते, उपजिल्हाप्रमुख बबन जाधव, अविनाश पाटील, अंकुश सुंब, संजय पिंपळे, जगन्नाथ पवार, संतोष जेजुरकर, संतोष खेंडके, किशोर कच्छवाह, तालुकाप्रमुख मनाजी पाटील मिसाळ, संजय मोटे, सुभाष कानडे, राजू वरकड, विष्णू जाधव, मनोज पेरे, आनंद भालेकर, शंकर ठोंबरे, सोमीनाथ करपे, रघुनाथ घडमोडे, दिलीप मचे, तालुका संघटक मनोज गायके, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, नगरसेवक सचीन खैरे, विधानसभाप्रमुख प्रमोद ठेंगडे, विधानसभा संघटक गिरीश चपळगावकर, वीरभद्र गादगे, नारायण जाधव, नारायण कानकाटे, रामेश्व कोरडे, राहूल सोनवणे, कान्हू चक्रनारायण, आत्माराम पवार, कुणाल पाठक, नितीन पवार, राजेंद्र दानवे, संजय हरणे, नंदू लबडे, महिला आघाडीच्या दुर्गा भाटी, सुकन्या भोसले, मीरा देशपांडे, युवासेनेचे विभागीय सचिव अ‍ॅड. धर्मराज दानवे, उमेश मोकासे, आदींची उपस्थिती होती.