अप्रतिम प्लॅनिंगमुळेच मराठा रॉयल्स ठरली डबल विजेती, संघाचे लायजनिंग मॅनेजर सुनील रामचंद्रन यांनी सांगितला फायनलचा थरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा रॉयल्सने टी 20 मुंबई लीगच्या जेतेपदाला गवसणी घातली. सलग दुसऱ्यांदा जेतेपद जिंकणे अशक्यप्राय समजले जाते, पण संघाने हे करून दाखवलं ते अप्रतिम प्लॅनिंगच्या जोरावरच हे सांगतानाच मराठा रॉयल्सचे लायजनिंग मॅनेजर सुनील रामनचंद्रन यांनी फायनलचा थरार सांगितला.

चिन्यम सुतार ठरला मॅचविनर

पण सेमी फायनल आणि फायनलमध्ये चिन्मय सुतार आमच्यासाठी हुकमी एक्का ठरला. फायनलमध्ये आमचे सलामीवीर लवकर बाद झाले; पण त्याच्या अर्धशतकाच्या जोरावरच संघाला दमदार मजल मारता आली. चिन्मय आणि सिद्धेशची भागीदारी निर्णायक ठरली. संघाने त्याच्यावर मेहनत घेतली होती आणि फायनलच्या सामन्यातील संधीचे सोने त्याने करून दाखवले, असे रामचंद्रन यांनी सांगितले.

सिद्धेशच्या चलाख नेतृत्वामुळे विजय

सिद्धेश लाडच्या चलाख नेतृत्वामुळे संघाला विजय मिळवता आला. कारण आम्हाला 20 धावा कमी पडल्या होत्या हे माहिती होते; पण सिद्धेशने ज्या चलाखीने गोलंदाज वापरले आणि समोरच्या फलंदाजांना रोखले हे पाहणे अप्रतिम होते. त्यामुळे विजयाचे सर्वात मोठे श्रेय सिद्धेशला द्यायला रामचंद्रन विसरले नाहीत.

अथर्व भोसलेने केली दमदार बोहनी…

अथर्व भोसलेने पहिल्याच षटकात मुशीर खानला बाद केले आणि दमदार बोहनी केली. त्यानंतर सामना दोलायमान अवस्थेत होता; पण अखेर दमदार नेतृत्व आणि त्याला खेळाडूंची मिळालेली सुयोग्य साथ हे आमच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले, असे रामचंद्रन म्हणाले.

एमसीएचे नेत्रदीपक आयोजन

मुंबई क्रिकेट संघटनेने यावेळी लीगचे नेत्रदीपक आयोजन केले होते. एमसीएने ही स्पर्धा आयपीएलच्या स्तरावर आणून ठेवल्याचे पाहायला मिळाले. एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि लीगचे गव्हर्नर राजदीप गुप्ता यांनी अप्रतिम काम केलं आहे, असेही रामचंद्रन यांनी सांगितलं.

पडद्यामागचे विजयाचे शिलेदार

संघाने विजय मिळवला, ट्रॉफी जिंकली; पण पडद्यामागच्या शिलेदारांचा उल्लेख नक्कीच व्हायला हवा. मुख्य प्रशिक्षक अमित दाणी यांच्यासह सहाय्यक प्रशिक्षक जुड सिंग, भावेश पटेल, अंकित चव्हाण आणि ओमकार खानविलकर यांनी संघासाठी घेतलेली मेहनत फळाला आली हे सांगायला रामचंद्रन विसरले नाहीत.