
तिरंगी मालिकेतील 15 जून रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात श्रीलंका-A संघाने हिंदुस्थान-A संघाचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. मैदानावरही गरमा गरमीचं वातावरण पाहायला मिळालं. मात्र, अशा परिस्थितही एक गोष्ट क्रीडा प्रेमींच्या हृदयाला भिडून गेली. श्रीलंकेचे 74 वर्षीय दिग्गज माजी कर्णधार अनुरा तेन्नेकून हिंदुस्थानचा उगवता सितारा 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला भेटण्यासाठी कोलंबोहून रंगिरी आंतरराष्ट्रीय स्डेडियमवर दाखल झाले होते. सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रुमच्या बाहेर वैभवची तासभर त्यांनी वाट पाहिली. वैभव भेटल्यानंतर त्यांनी त्याच तोंडभरू कौतुक केलं तर वैभवनेही पाया पडून त्यांचे आशिर्वाद घेतले.
Sportsstar च्या वृत्तानुसार, श्रीलंकेचे पहिले एकदिवसीय कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू असलेल्या तेन्नेकून यांनी केवळ 15 वर्षांच्या वैभवाला भेटण्यासाठी कोलंबोवरून हा प्रवास केला होता. “तो एक विलक्षण आणि ‘जनरेशनल’ टॅलेंट आहे,” अशा शब्दांत त्यांनी वैभवचे कौतुक केले. इंडिया-A चा कर्णधार तिलक वर्मा याच्याशी काही वेळ गप्पा मारत त्यांनी तब्बल एक तास वैभवची वाट पाहिली. तोपर्यंत मैदानावरील पराभवामुळे आणि सुपर ओव्हरनंतर झालेल्या एका वादामुळे वैभव कमालीचा निराश आणि थकला होता. अखेर जेव्हा वैभव ड्रेसिंग रूममधून बाहेर आला, तेव्हा दिग्गज तेन्नेकून यांना समोर पाहून त्याचा चेहरा खुलला. त्याने आदराने पुढे होत तेन्नेकून यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला, तर तेन्नेकून यांनीही त्याला प्रेमाने मिठी मारली.
चालकाचा हलगर्जीपणा जीवावर बेतला! रेल्वे आणि बसच्या भीषण अपघातात 2 मुलांसह 9 जणांचा मृत्यू
दोघांमधील ही भेट काही मिनिटांचीच होती, पण ती वैभवसाठी खूप महत्त्वाची ठरली. तेन्नेकून यांनी त्याला मोलाचा सल्ला देत म्हटले, “तू फक्त तुझ्या खेळावर लक्ष केंद्रित कर आणि बाहेरील गोष्टींकडे दुर्लक्ष कर. आजचा दिवस तुझा नव्हता, पण हा खेळाचा भाग आहे; आपण रोजच मोठी खेळी करू शकत नाही.” IPL मधील वैभवच्या फलंदाजीचे कौतुक करत ते पुढे म्हणाले, “त्याच्यात चौकार-षटकार मारण्याची जी अद्भूत क्षमता आहे, त्याने मला खूप प्रभावित केले आहे. त्याने असाच खेळ पुढे चालू ठेवावा.” मैदानातील वाद आणि पराभवाच्या गदारोळात एका 74 वर्षीय दिग्गजाने तरुण खेळाडूचे मनोधैर्य वाढवण्यासाठी दाखवलेला हा संयम आणि जिव्हाळा क्रिकेट जगताला एक सुंदर संदेश देऊन गेला.
Vaibhav Sooryavanshi couldn’t have asked for a better day to be blessed with such an advice by Anura Tennekoon, a Sri Lankan cricket OG who travelled from Colombo to Dambulla just to meet the Boss Babypic.twitter.com/bTOAelrntP
— Amol Karhadkar (@karhacter) June 15, 2026


























































