Ratnagiri News – कोकणनगर परिसरात सातत्याने वीज पुरवठा खंडित, शिवसेनेची महावितरणकडे तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी शहरातील कोकणनगर परिसरात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही ते लक्ष देत नसल्याची तक्रार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक केतन शेट्ये आणि नगरसेविका फौजिया मुजावर यांनी महावितरणच्या अतिरिक्त अभियंता यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली आहे.

रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील चर्मालय, स्टेट बँक कॉलनी, म्हाडा कॉलनी आणि नगरपरिषद कर्मचारी वसाहत येथे दिवसातून चार-पाच वेळा वीज पुरवठा खंडित केला जातो. या परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा. तसेच नायाबनगर इक्रा स्कूलजवळ असलेला डिपी बॉक्सकार दरवाजा नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे त्या डिपीला दरवाजा बसवावा, अशी मागणी नगरसेवक केतन शेट्ये व नगरसेविका फौजिया मुजावर यांनी केली. यावेळी शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, नगरसेवक अमित विलणकर, विभागप्रमुख साजिद पावसकर उपस्थित होते.