
अमेरिकी नौदलाच्या हल्ल्यात मरण पावलेल्या तीन हिंदुस्थानी खलाशांबाबत बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच अजब वक्तव्य केले. ‘खलाशांचा व्यवसाय अत्यंत खडतर असतो. त्यांच्याबाबतीत अशा घटना घडत असतात,’ असे ट्रम्प म्हणाले.
जी-7 देशांच्या बैठकीसाठी फ्रान्समध्ये असलेले पंतप्रधान मोदी व डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी हिंदुस्थान-अमेरिकेच्या संबंधांबाबत विविध प्रश्नांना उत्तरे दिली. तीन खलाशांच्या कुटुंबीयांसाठी काय शोकसंदेश द्याल, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ट्रम्प म्हणाले, ‘मी त्याबद्दल ऐकले आहे. त्यांचे काम खडतर आणि धोकादायक असते. अशा घटना अधूनमधून होत असतात. हिंदुस्थान आणि अमेरिका त्या मुद्दय़ावर चर्चा करेल. सर्व हिंदुस्थानी आम्हाला प्रिय आहेत,’ असे ट्रम्प म्हणाले.
हल्ला झाल्यास अमेरिका मदत करेल!
‘नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात हिंदुस्थानवर हल्ला झाल्यास अमेरिका त्यांना मदत करेल. मात्र, मोदी असतील तोपर्यंतच ही मदत दिली जाईल. दुसऱ्या कोणा नेत्यासाठी आम्ही हे करूच असे सांगता येणार नाही,’ अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी हिंदुस्थान-अमेरिका संरक्षण संबंधांबाबत बोलताना व्यक्त केली. मोदींकडे वाटाघाटी करण्याचे उत्तम काwशल्य आहे म्हणत ट्रम्प यांनी काैतुक केले.





























































