श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिरात गैरव्यवहार, सीबीआय चौकशीची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मथुरेतील कृष्ण जन्मभूमी खटल्यातील एका याचिकाकर्त्याने बुधवारी श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिरातील देणग्यांच्या व्यवस्थापनात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला असून या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिरातील देणग्यांशी संबंधित घोटाळ्यासारखीच परिस्थिती येथेही घडत आहे, असा दावा श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास या संघटनेचे अध्यक्ष दिनेश फलाहारी महाराज यांनी केला आहे.