महाकाल मंदिरात आलेल्या मुस्लिम तरुणाला मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात भस्मारतीच्या रांगेत उभ्या असलेल्या एका मुस्लिम तरुणाला त्याचे आधार कार्ड पाहून मारहाण केली. सरफराज शेख असे या तरुणाचे नाव असून तो पुण्याहून एका हिंदू तरुणीसोबत उज्जैन दर्शनासाठी आला होता. तरुणाच्या कपाळावर ‘महाकाल’ असे नाव लिहिलेले होते. रांगेत उभे असताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना त्या तरुणावर संशय आला. त्यांनी त्याचे आधार कार्ड तपासले असता तो मुस्लिम निघाला.