FIFA World Cup 2026 …मग मेस्सीवर कारवाई का केली नाही?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
lionel-messi-foul-on-algeria-player-video-viral-no-card-action-by-referee-world-cup-controversy (1)

लिओनेल मेस्सीने आपल्या वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यातच गोलहॅटट्रिक साजरी केली आणि त्याच्या चाहत्यांनी त्याला डोक्यावर घेतले. पण या सामन्यात मेस्सीकडून एक चूक घडली होती. खेळाला जी गोष्ट साजेशी नाही ती मेस्सीने मैदानात केली. पण तरीही त्याच्यावर कोणतीही कारवाई पंचांनी केली नसल्याचे समोर आले आहे.

ही गोष्ट घडली ती 32 व्या मिनिटाला. त्यापूर्वी मेस्सीने एक गोल केला होता. यावेली अल्जेरियाचा खेळाडू चेंडूवर ताबा मिळवू पाहत होता आणि त्याच्या मागे मेस्सी होता. अल्जेरियाचा खेळाडू चेंडूवर सहजपणे ताबा मिळवेल, असे दिसत होता. कारण चेंडू त्याच्या पायाच्या पुढे होता आणि मेस्सी त्याच्या मागे होता. पण त्यावेळी मेस्सीने खेळाला न साजेशी एक गोष्ट केली. मेस्सीने यावेळी आपला पाय अल्जेरियाच्या खेळाडूच्या पोटऱ्यावर जोरात दाबला.

फुटबॉलपटूंच्या बुटांना स्पाइक्स असतात आणि ते जोरदार टोचतात, त्यामध्ये मेस्सीचा बूट लागल्यावर अल्जेरियाचा खेळाडू थेट मैदानात आडवा झाला आणि कळवळायला लागला. हे मेस्सी पाहत होता. त्यावेळी मेस्सीने आपले हात वर केले आणि आपण काहीच केले नसल्याचा बनाव केला. पण पंचांनी मेस्सीवर कोणतीही कारवाई केली नाही. आता तर मैदानात सर्वत्र कॅमेरे असतात आणि त्याचा वापर पंच करू शकतात, पण पंचांनी ती तसदी घेतली नाही. त्यामुळे मेस्सी दिग्गज खेळाडू असल्यामुळे त्याच्यासाठी वेगळा न्याय पंचांनी लावल्याचे पाहायला मिळाले. पण मेस्सीचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. त्यानंतर मेस्सी हे बरं नव्हं, अशी चर्चा क्रीडा वर्तुळात रंगत आहे.