नॉर्वेच्या विजयात हॉलंडची चमक, इराकला 4-1 गोलफरकाने हरवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
norway-beats-iraq-4-1-fifa-world-cup-erling-haaland-scores-brace-in-historic-return

स्टार स्ट्रायकर एर्लिंग हॉलंडच्या दोन गोलांच्या जोरावर नॉर्वेने फिफा वर्ल्ड कपमधील पुनरागमन संस्मरणीय केले. तब्बल 28 वर्षांनंतर विश्वचषकात खेळणाऱया नॉर्वेने ‘आय’ गटातील सलामीच्या सामन्यात इराकचा 4-1 गोलफरकाने सहज पराभव केला.

मँचेस्टर सिटीचा आघाडीपटू हॉलंडचा हा पहिलाच मोठा आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सामना होता. त्याने त्यात दोन गोल झळकावत आपली छाप पाडली. 29 व्या मिनिटाला हॉलंडने जवळून अचूक फटका मारत नॉर्वेला आघाडी मिळवून दिली. मात्र, इराकच्या अयमेन हुसेनने दमदार हेडरद्वारे बरोबरी साधत सामना रंगतदार केला. पहिल्या सत्राच्या अखेरीस इराकच्या बचावफळीतील चुकीचा हॉलंडने पुरेपूर फायदा घेतला. गोलरक्षक जलाल हसनच्या चुकीच्या क्लिअरन्सचा चेंडू हॉलंडच्या पायाला लागून थेट जाळ्यात गेला आणि नॉर्वेने पुन्हा आघाडी घेतली. या गोलसह हॉलंडची आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोलसंख्या अवघ्या 51 सामन्यांत 57 वर पोहोचली. दुसऱया सत्रात बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या लिओ ओस्टिगार्डने 76 व्या मिनिटाला मार्टिन ओडेगार्डच्या कॉर्नरवर शानदार हेडर करत नॉर्वेची आघाडी 3-1 अशी वाढवली. अतिरिक्त वेळेत इराकच्या अयमेन हुसेनच्या आत्मघातकी गोलमुळे नॉर्वेच्या विजयाला अधिक चमक मिळाली.