
नॉर्वेच्या आक्रमक खेळापुढे इराकचा निभाव लागला नाही. नॉर्वेने यापूर्वी 1998 मध्ये विश्वचषकात सहभाग घेतला होता. त्यावेळी विद्यमान प्रशिक्षक स्टाले सोलबाकेन संघाचे सदस्य होते. हॉलंड आणि मार्टिन ओडेगार्ड यांच्या नेतृत्वाखालील ही नवी पिढी उत्तर अमेरिकेतील विश्वचषकात 28 वर्षांनंतर इतिहास घडविण्याच्या निर्धाराने उतरली आहे.


























































