
विधी अधिकारी अभय जाधव यांना महासभेने आज निलंबित केले. जाधव यांनी सभागृहापासून माहिती लपवून ठेवली आणि चुकीची माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप सभागृहाने केला आहे. त्यांचा निलंबनाचा ठराव मांडल्यानंतर महापौर सुजाता पाटील यांनी जाधव यांच्या निलंबनासाठी सभागृहात मतदान घेत ठराव मंजूर केला.



























































