अधिकृत फेरीवाल्यांना क्यूआर कोड ओळखपत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अधिकृत फेरीवाल्यांच्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी महापालिकेने त्यांना ‘क्यूआर कोड’ आधारित ओळखपत्रे देण्यास सुरुवात केली आहे. महापालिका मुख्यालयात महापौर रितू तावडे यांच्या हस्ते १०० फेरीवाल्यांना प्रातिनिधिक स्वरूपात ओळखपत्रे देऊन या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

या मोहिमेमार्फत शहरातील ९९ हजार ४३५ नोंदणीकृत फेरीवाल्यांना ओळखपत्रे दिली जाणार आहेत. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करताना कोणावरही अन्याय होऊ नये आणि पात्र फेरीवाले लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आणि ठरवून दिलेल्या मुदतीत नगर पथविक्रेता अधिनियमाच्या आधारे फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्रे वितरित करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.