
मुंबईत एक दिवस बरसून सर्वांची तारांबळ उडवून जाणारा पाऊस कोकणासह राज्याच्या अनेक भागात दमदार बरसत असताना मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणक्षेत्रात मात्र पावसाने अजूनही ओढ दिली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठ्याने तळ गाठला असून फक्त 7.53 टक्के पाणी उपलब्ध आहे. राखीव पाणीसाठा व धरणातील उपलब्ध पाणीसाठा बघता 17 ऑगस्टपर्यंत मुंबईची तहान भागवेल इतकाच शिल्लक आहे. त्यामुळे धरणक्षेत्रात जोरदार पावसाची आस लागून राहिली आहे.
































































