
नीट परिक्षेच्या पेपरफुटीचे प्रकरण गाजत असताना आता पेपरफुटीची आणखी एक प्रकारण समोर येत आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षेचा (TET) पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या नीट पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे टीईटी परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण तयारी करण्यात आली होती. पण परीक्षेच्या एक दिवस आधी हा पेपर फुटल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीत टीईटी परीक्षेचा पेपर लीक झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे उद्या 28 जून रोजी होणारी परीक्षा तातडीने रद्द करण्यात आली आहे. जवळपास 2 लाखांहून अनेक विद्यार्थी ही परीक्षा देणार होते. पण परीक्षेच्या एक दिवस आधी पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळातर्फे अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत २८ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण १०२८ केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ घेण्यात येणार होती. मात्र त्यापूर्वीच २७ जून, २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास गोपनिय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही लोकांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता, या लोकांकडे शिक्षक पात्रता परीक्षा (TET) जून २०२६ परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
ही परिस्थिती लक्षात घेता २८ जून, २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलण्यात येत असल्याचे निवेदतून स्पष्ट करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. शिक्षक पात्रता (TET) परिक्षेबाबत अद्यावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.
टीईटी परीक्षेवर आता ‘एआय’चा वॉच, उद्या होणाऱ्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी हायटेक यंत्रणा



























































