
प्रल्हादराय डालमिया लायन्स कॉलेजच्या ‘राष्ट्रीय सेवा योजना’ अंतर्गत लायन्स क्लब ऑफ मालाड-बोरिवली आणि मालाड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरादरम्यान मोफत मधुमेह, हिमोग्लोबिन, रक्तदाब, रक्तगट व हाडांच्या मिनरल डेन्सिटीची तपासणीही करण्यात आली. तसेच ‘मेडिकल हिस्ट्री’ जाणून उपचारविषयक सल्लादेखील देण्यात आला.
प्रल्हादराय डालमिया लायन्स महाविद्यालय परिसरात आयोजित केलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत 108 रक्तदात्यांनी रक्तदान केले. महाविद्यालयाच्या कर्णधार परिषदेचे महामंत्री लायन कन्हैयालाल सराफ, लायन्स क्लब मालाड-बोरिवलीचे अध्यक्ष लायन निर्माण सराफ आणि मालाड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मुकेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर पार पडले. कार्यक्रमात मुरारीलाल तुलस्यान, विवेक नारसरिया, अमित अग्रवाल, विकास सराफ, सुनील लावोटी व प्राचार्य प्रा. डॉ. डी. एन. गंजेवार उपस्थित होते. क्लबचे बिपीन अग्रवाल यांच्यासह दिनेश अग्रवाल, संगीता कामलिया, शारदा सराफ, कमल रुईया, संदीप डीडवानिया यांनी कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.
































































