
हिंदूंची मंदिर मोगलांनी लुटली, औरंगजेबाने लुटली, महमूद गजनवीन लुटली, असे इतिहासामध्ये नमूद आहे. भारतीय जनता पक्षानं आम्ही मंदिराचे कसे संरक्षक आहोत, हे दाखवून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला पण आता ज्या प्रकारे मंदिर लुटली जाता आहेत. राम मंदिर असेल, केदारनाथ, बद्रीनाथ असेल, त्यानंतर दक्षिणेतली मंदिर असतील या सगळ्या मंदिराचे चोर आहेत दरोडेखोर आहेत, ते भारतीय जनता पक्षाचे लोकं आहेत. पूर्ण राम मंदिर कसं लुटलं हे रोज आम्ही सांगतो आहोत. सीतामाईच मंगळसूत्र चोरावं या लोकांनी, सीतामाईला 27 महिला भक्तांनी मंगळसूत्र दान दिलं होतं. ते मंगळसूत्रसुद्धा या लोकांनी लुटलं अजून काय लुडायचं राहिलं. आता याविरोधात शिवसेनेनं काय शंख फुंकला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काल दादरला हनुमान मंदिरासमोर जे रामरक्षा आंदोलन झाले. ते फक्त एका दिवसाचं आंदोलन नव्हतं. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाचा वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही, असं ते म्हणाले. .
सर्वप्रथम राम मंदिर ट्रस्ट बरखास्त केले पाहिजे, संपूर्ण राम मंदिर ट्रस्ट, चंपत राय राम मंदिर ट्रस्टविरुद्ध एफआयआर दाखल केला पाहिजे. यात पाचपेक्षा जास्त लोक सामील आहेत, रामाला लुटले, देशाला लुटले, लोकांचा विश्वासघात, श्रद्धेचा विश्वासघात, विश्वासाचा विश्वासघात, तरीही देशाचे गृहमंत्री किवा मोदीजींकडून कोणतेही निवेदन नाही, योगींकडून कोणतेही निवेदन नाही. पक्षाध्यक्षांकडून कोणतेही निवेदन नाही, राष्ट्रीय अध्यक्षांकडून कोणतेही निवेदन नाही. कोणीही याबाबत तोंड उघडलेले नाही. सर्व लपवण्याचा प्रयत्न होत आहे.
या देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये अजूनही काही आशेचे किरण दिसतात, तेव्हा त्या किरणांचे स्वागत केलं पाहिजे. न्यायव्यवस्थेमध्ये अजूनही काही रामशास्त्री आहेत, हे न्यायमूर्ती माधव जमादार यांनी दाखवून दिलं म्हणून त्यांचं अभिनंदन करणं सध्याच्या स्थितीत हे आमचं, नागरिकांच कर्तव्य आहे. आम्ही अनुभव घेतला सगळ्या मुख्य न्यायाधीशांचा एका शब्दात त्यांच्या विषयी बोलायचं म्हणजे सगळे भंपक होते.
तीन हजार कोटींचा पुतळा सरदार वल्लभभाई पटेलचा कुठे बसवला गुजरातमध्ये. चीनच्या वृत्तपत्रामध्ये बातमी आली आहे. त्या पुतळ्याची खरं खरी किंमत 350 कोटी मग हे पैसे वरचे साधारण 3000 कोटी कोणी खाल्ले? सरदार पटेलाच्या पुतळ्यात पण यांनी भ्रष्टाचार केला. साडेतीनशे कोटीचा पुतळा तीन हजार कोटीला दाखवला. गुजराती ठेकेदार, गुजराती व्यापारी सरदार पटेलांना सोडत नाहीत. प्रभू श्रीरामाला सोडत नाहीत सीतामाईला सोडत नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? असा सवाल त्यांनी केला.



























































