लखनौत निवृत्त अधिकाऱ्याच्या घरात घबाड; 13 किलो सोने आणि 9 किलो चांदी, 1.62 कोटी रोख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील निवृत्त सहाय्यक विभागीय परिवहन अधिकारी ललित कुमार यांच्या लखनौ येथील घरावर दक्षता पथकाने छापा टाकला. 26 तास चाललेल्या या छाप्यात ललित कुमार यांच्या घरातून तब्बल 13 किलो सोने, 9 किलो चांदी आणि हिऱ्यांचे दागिने जप्त करण्यात आले. याची किंमत 20 कोटी रुपये आहे.

पथकाने छापा टाकला त्या वेळी अधिकाऱ्याला जवळपास 1.62 लाख रुपये रोख रक्कम मिळाली. ही रक्कम पाकिटांमध्ये भिंतीत आणि वेगवेगळ्या खोल्यांमध्ये लपवून ठेवली होती. 15 ठिकाणी घरे, फ्लॅट आणि शेतजमिनींची कागदपत्रेही मिळाली आहेत.