
दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र अद्याप थांबले नसून जानेवारी ते जून या सहा महिन्यांमध्ये तब्बल 465 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. जून महिन्यात सर्वाधिक 91 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. मराठवाड्यात विविध कारणांमुळे या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यापैकी 215 प्रकरणे ही मदतीस पात्र ठरली असून 222 प्रकरणांवरील चौकशी व निर्णय प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे.
मराठवाड्यात आत्महत्या केलेल्या सर्वाधिक 109 आत्महत्या या छत्रपती संभाजीनगर जिह्यात झाल्या आहेत. बीडमध्ये 95, धाराशीवमध्ये 65, नांदेडमध्ये 61, जालना 40, हिंगोली 35, परभणी 34 आणि लातूर जिह्यात 26 आत्महत्यांची नोंद करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिह्यातील 109 प्रकरणांपैकी 45 प्रकरणे ही मदतीस पात्र असून 2 अपात्र आहेत, तर 62 प्रकरणांची चौकशी सुरू आहे. जून महिन्यात या जिह्यात 21 आत्महत्या झाल्या असून एकाही प्रकरणाला सरकारी पातळीवर मदतीची पात्रता मिळाली नाही. सर्व 21 प्रस्ताव प्रलंबित आहेत. बीड जिह्यात 95 पैकी 56 प्रकरणे पात्र, 13 अपात्र आणि 26 प्रलंबित आहेत. धाराशीवमध्ये 65 पैकी 24 पात्र असून 41 प्रकरणे निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. नांदेडमध्ये 61 पैकी 35 प्रकरणे पात्र, 25 प्रकरणे प्रलंबित आहेत. एकूण 465 प्रकरणांपैकी मदत वितरित झालेल्या पुटुंबांची संख्या 108 इतकी आहे. पुटुंब प्रमुखांच्या आत्महत्येनंतर राज्य सरकारकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी पुटुंबाला दोन लाख आर्थिक मदत दिली जाते.
जिल्हा आत्महत्या पात्र प्रलंबित
छत्रपती संभाजीनगर 109 45 63
बीड 95 56 26
धाराशीव 65 24 41
नांदेड 61 35 25
जालना 40 19 19
हिंगोली 35 11 19
परभणी 34 12 18
लातूर 26 13 12
एकूण 465 215 222




























































