नीट पेपरफुटी प्रकरण; मोटेगावकर, कुलकर्णींच्या कोठडीत वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णी आणि रेणुकाई करिअर सेंटरचे संस्थापक शिवराज मोटेगावकर या दोघांच्या न्यायालयीन कोठडीत राऊस एव्हेन्यू न्यायालयाने 11 जुलैपर्यंत वाढ केली आहे. मूळचा लातूरचा असलेला पी. व्ही. कुलकर्णी हा रसायनशास्त्राचा तज्ञ असून तो सलग काही वर्षे नीटचा पेपर काढणाऱ्या समितीचा सदस्य होता. तसेच मोटेगावकर याने आपल्या कोचिंग सेंटरच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका आणि उत्तरे प्रसारित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असा सीबीआयचा आरोप आहे.