
कोटय़वधी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पळालेला आणि आता ब्रिटनमध्ये राहणाऱ्या विजय मल्ल्याच्या वकिलांनी खटला लढण्यास नकार दिला आहे. विजय मल्ल्या बऱ्याच काळापासून आपल्या संपका&त नाही. त्यामुळे आपण त्याची बाजू मांडू शकत नाही, असे मल्ल्याची बाजू मांडणाऱ्या वकिलाने सांगितले आहे. हे प्रकरण 2004 पासून कोर्टात प्रलंबित असून आता दिल्ली उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. खैतान अँड कंपनी या विधी संस्थेने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

































































