बद्रीनाथ देणगी चोरी; मुख्य आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बद्रीनाथ धाममधील देणगी चोरीच्या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रमोद नौटियाल याला पोलिसांनी अटक केली. प्रमोद हा बद्री-केदार मंदिर समिती (बीकेटीसी) चे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांचा खासगी सचिव होता, असे सांगितले जात आहे. परंतु हेमंत द्विवेदी यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.