1 ऑगस्टपासून विमान वाहतूक टर्मिनल-2 वरून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या 1 ऑगस्टपासून अकासा एअर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व विमान वाहतूक टर्मिनल-2 वरून सुरू करणार आहे. हा बदल खर्च व्यवस्थापनासाठी व विस्तारासाठी 1 हजार 50 कोटी रुपये निधी उभारण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. तसेच प्रवाशांना अधिक सोयीचे व्हावे यासाठी करण्यात आले आहे.

अकासा एअरने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आपली सर्व देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान सेवा टर्मिनल-2 मध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा टर्मिनल बदल मुंबईहून उड्डाण करणाऱ्या अकासा एअरच्या सर्व विमानांना लागू होईल. प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी आपल्या विमान व टर्मिनलचा तपशील तपासावा, असा सल्ला विमान कंपनीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.