
योगीराज गगनगिरी महाराज यांच्या खोपोली येथील आश्रमात दरवर्षीप्रमाणे यंदाही २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार २८ ते गुरुवार ३० जुलै असा तीन दिवस हा उत्सव होणार आहे. २८ जुलैपासून आश्रमस्थानी भजन, कीर्तन, प्रवचन, नामस्मरण, होमहवन आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. २९ जुलै रोजी पहाटे चार वाजल्यापासून मंगलस्नान, पादुका पूजा, अभिषेक यानंतर मुख्य दर्शनास प्रारंभ होईल. रात्री ८.३० वाजता महाआरतीचा कार्यक्रम होणार असून सकाळी १० वाजल्यापासून भक्तगणांना प्रसादाचे वाटप करण्यात येईल. या कार्यक्रमाची सांगता ३० जुलै रोजी होमहवनाने होणार असल्याची माहिती आश्रम संस्थेच्या वतीने देण्यात आली.




























































